Wednesday, January 12, 2011

Veer Vinayak Dmodar Savarkar

 
 
 
 
 
 
 
 
 
 
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी २८ मे, १८८३ रोजी झाला. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. त्यांचे वडील दामोदरपंत १८९९ च्या प्लेगास बळी गेले. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.

मार्च १९०१ मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर, १९०२ साली फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला १९०६ साली उच्च शिक्षणासाठी सावरकर लंडनला गेले. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले.

सावरकर हे क्रांतिकारक होतेच शिवाय ते महाकवी होते. कादंबरीकार, इतिहासकार, तसेच नाटककारही होते. वीर सावरकरांनी ,००० च्या हुन जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. क्वचितच कोणी इतर मराठी लेखकाने इतका अमुल्य ठेवा मराठी भाषेला दिला असेल. अंदमानातील कारावासात बंदिवान असताना कारागृहाच्या भिंतींवर घायपात्याच्या काटय़ाची लेखणी करून त्यांनी खंडकाव्य लिहिले.
त्यांच्या सागरा प्राण तळमळला, हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, जयोस्तुते, तानाजीचा पोवाडा ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांचे "सावरकरांच्या गोष्टी" हे कथा संग्रह आणि "माझी जन्मठेप" , "शत्रूच्या शिबिरात" "अथांग" हे आत्मचरित्रपर संग्रह प्रसिद्ध आहेत. 'काळेपाणी' 'मला काय त्याचे' ह्या कादंबञा तसेच कमला, गोमांतक, विरहोच्छास, सप्तर्षी, सावरकरांच्या कविता हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.   अशा या रणझुंजाराचा जीवन संग्राम वयाच्या ८३व्या वर्षांपर्यंत चालू होता. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी तात्यांनी आपल्या देहाचा त्याग केला आणि देशप्रेमाने धगधगणारे एक स्थंडील शांत झाले.